Breaking

Wednesday, January 27, 2021

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना वांद्रे, माहीममध्ये धोका https://ift.tt/3oloRxj

शैलेश जाधव, मुंबई माहीम : मुंबईसाठी पालघरहून येणाऱ्या मोठमोठ्या जलवाहिन्या फोडून त्यातून होत असल्याचे दिसून येत आहे. वांद्रे-माहीम भागात ही चोरी सर्वाधिक होत आहे. काही ठिकाणी वाहिन्यांना छिद्र पाडून तर काही ठिकाणी व्हॉल्व्हजवळील गळतीचा फायदा घेत ही चोरी केली जात आहे. मुंबई शहर व उपनगरला ठाणे आणि जिल्ह्यातून पाण्याचा पुरवठा होतो. हे पाणी तीन ते चार फूट व्यासाच्या लोखंडी वाहिन्यांनी शहर व उपनगरात आणले जाते. परंतु या वाहिन्यांमधून पाणी चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. वांद्रे ते माहीम दरम्यान अनेक ठिकाणी या जलवाहिन्या खारफुटी जंगलातून जातात. अनेक भागात त्या उघड्यावर आहेत. यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होताना दिसते. वाचा: यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'च्या छायाचित्रकाराने माहीम भागातून एक बोलके छायाचित्र टिपले आहे. या छायाचित्रात अशा जलवाहिन्यांना छिद्र पाडून त्यातून पाणी चोरी उघडपणे होताना दिसते. चोरलेले पाणी नेण्यासाठी चोरट्यांनी थेट ऑटोरिक्षाच आतमध्ये नेली आहे. तर त्याच ठिकाणी कपडे धुण्याचा कार्यक्रमही बिनधास्त होत आहे. माहीमच्या याच भागात जलवाहिन्यांना लागून असलेल्या धारावीच्या काही भागात भंगार आणि प्लास्टिक पुनर्निर्माणाचे कारखाने आहेत. या कारखान्यांचा कचरा या जलवाहिन्यांच्या परिसरामध्ये जाळला जातो. त्याचाही या वाहिन्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पण त्याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. संरक्षक भिंतीचे काय? मुंबईच्या जलवाहिन्या दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरण्याचा धोका आहे. याबाबत पोलिसांकडून आधीच प्रशासनाला सावध करण्यात आले आहे. त्यामुळे या वाहिन्यांभोवती संरक्षक भिंत उभारण्याचा प्रकल्प महापालिकेच्या विचाराधीन आहे. पण तसा कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भात संबंधित अभियंत्यांशी संपर्क होऊ शकला नाही. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3t5WiHI

No comments:

Post a Comment