Breaking

Thursday, January 28, 2021

'बजेट' काउंडाऊन सुरु; थोड्याच वेळात आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडणार https://ift.tt/2NLuWGV

नवी दिल्ली : करोना संकटाने व्यापलेल्या २०२०-२१ या वर्षात सरकारने आर्थिक आघाडीवर कशी कामगिरी केली याचे प्रगती पुस्तक अर्थात आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल ( present today in ) आज संसदेत मांडला जाणार आहे. आजपासून दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला औपचारिक सुरुवात होईल. करोना विषाणूने देशात शिरकाव केल्यानंतर मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय टाळेबंदी घोषित केली होती. जवळपास अडीच महिन्यांहून अधिक काळात कठोर टाळेबंदीची अमलबजावणी झाली. यामुळे आर्थिक घडामोडी पूर्ण ठप्प झाल्या. लाखो कोटींचा व्यवसाय बुडाला. कोट्यवधी बेरोजगार झाले होते. विकासदराने उणे २३ टक्क्यांची ऐतिहासिक नीचांक गाठला होता. आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. यंदा आर्थिक पाहणी अहवालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. चालू वर्षात करोनाने अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे आर्थिक पाहणीमध्ये विकासदराचा काय अंदाज लावला जातो याची गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक कृषी उत्पादन, कारखाना उत्पादन, पायभूत सेवा सुविधा, परकीय व्यापार, महागाई, रोजगार अशा महत्वाच्या घटकांच्या कामगिरीवर आर्थिक पाहणीमध्ये प्रकाश टाकण्यात येणार आहे. आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल २०२०-२१ (Economic Survey) शुक्रवारी २९ जानेवारी रोजी संसदेत सादर केला जाईल. निर्मला सीतारामन हा अहवाल संसदेपुढे मांडतील. आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा अर्थ खात्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. सरत्या आर्थिक वर्षात सरकारने कोणती विकास कामे केली, किती खर्च केला, सरकारने निधी कसा जमवला याचा लेखाजोखा मांडला जातो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cfLhOi

No comments:

Post a Comment