हरिद्वार : वय वर्ष ८३... आयुष्यातली जवळपास ६० वर्ष ध्यानस्थ होत गुंफेत काढली... पण आता मात्र याच व्यक्तीनं अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांचं दान केलंय. या घटनेमुळे अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. ऋषिकेशचे ८३ वर्षीय संत यांनी राम मंदिरासाठी केलंय. गेल्या ६० वर्षांपासून स्वामी शंकर दास गुंफेत राहून आयुष्य व्यतीत करत आहेत. आपले गुरु टाटवाले बाबा यांच्या गुफेत येणाऱ्या श्रद्धाळूंकडून मिळालेल्या अनुदानातून एक कोटींची रक्कम जमल्याचं स्वामी शंकर दास यांचं म्हणणं आहे. बुधवारी भगवे वस्र धारण करून, डोक्याला फेटा बांधून एक साधू ऋषिकेशच्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या मुख्य कार्यालयात दाखल झाला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. स्वामी शंकर दास यांनी एक कोटींचा चेक समोर केल्यानंतर तर अनेकांना धक्काच बसला. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण स्वामी शंकर दास यांचं अकाऊंट पाहिल्यानंतर चेक योग्य असल्याचं कर्मचाऱ्यांच्या ध्यानात आलं. त्यानंतर, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. ऋषिकेशचे आरएसएस प्रमुख सुदामा सिंघल यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सूचना मिळताच आम्ही तत्काळ बँकेत दाखल झालो. स्वामी थेट पैसे दानन करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला चेक दिला आणि आम्ही त्यांना दानाची पावती दिली. आता बँक मॅनेजर ट्रस्टच्या अकाऊंटमध्ये चेक जमा करतील. स्वामी शंकर दास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गुप्त दान करण्याची इच्छा होती. परंतु, मंदिर निर्माणासाठी अनेकांना प्रेरणा मिळावी, यासाठी दानाची रक्कम जाहीर केल्याचंही त्यांनी म्हटलंय. स्वामी शंकर दास यांना स्थानिक लोक फक्कड बाबा म्हणतात. लोकांनी दिलेल्या दान-दक्षिणेतूनच ते आपला उदरनिर्वाह करतात.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/36oKMxz
No comments:
Post a Comment