Breaking

Thursday, January 28, 2021

एसआरए घोटाळा: 'ओमकार ग्रुप'चे अध्यक्ष कमल गुप्ता यांनाअटक https://ift.tt/2Yo9MR5

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम कंपनी ओमकार ग्रुपचे अध्यक्ष यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घोटाळ्यासह अनेक बँकांची कर्जे या समुहाने बुडवली आहेत. घोटाळ्यांत अडकलेल्या येस बँकेने ओमकार समूहाला ४५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कर्ज बुडित खात्यात गेले. येस बँकेतील अशा सर्वच कर्ज बुडव्यांचा ईडी तपास करत आहे. त्यामुळेच ओमकार समूहाचाही ईडीने तपास सुरू केला. त्याअंतर्गत सोमवारी या समूहाच्या प्रवर्तकांच्या सात घरी व तीन कार्यालयांवर छापे टाकले. या छाप्यादरम्यान ईडीला आणखी माहिती मिळाली. त्यानुसार कमल गुप्ता हे २२ हजार कोटी रुपयांच्या एसआरए घोटाळ्यातदेखील सहभागी असल्याचे समोर आले आहे. याबाबत ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कमल गुप्ता तसेच ओमकार ग्रुपच्या अन्य प्रवर्तकांनी अनेक बँकांकडून कर्जे घेतली व ती बुडवली. अनेक कर्जे एसआरएच्या नावाखाली घेण्यात आली होती. परंतु या सर्व रक्कमेचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे.' या अटकेनंतर गुप्ता यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3os8sr7

No comments:

Post a Comment