Breaking

Wednesday, February 24, 2021

मुलगा जिवंत असल्याचं वाटून रात्रभर जखमांवर मलम लावत राहिली! https://ift.tt/2NXNnbo

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई येथील कलिनामध्ये वृद्ध महिलेने आपल्या ४२ वर्षीय काढल्याचा प्रकार समोर आला आहे. बाथरूममध्ये पडल्याने मृत्युमुखी पडलेला मुलगा जिवंत असल्याचे वाटल्याने ही माता त्याच्या जखमांवर मलम लावत बसली. या प्रकरणात वाकोला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाचा: मूळची मेघालय येथील असलेली ७० वर्षीय महिला आपल्या मुलासोबत कलिना परिसरात राहते. सोमवारी मध्यरात्री तिचा ४२ वर्षीय मुलगा दारूच्या नशेत असल्याने बाथरूममध्ये पडला. वृद्ध आईने त्याला खेचून बाथरूमबाहेर आणले आणि बेडवर झोपविले. पडल्याने त्याला काही जखमा झाल्या होत्या. या वृद्ध मातेने त्याच्या जखमांवर हळद; तसेच मलम लावले. सकाळ झाल्यानंतरही मुलगा उठत नसल्याने तिने नातेवाइकांना फोन करून कळविले. मुलगी; तसेच इतर नातेवाइकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्प्ष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3bA3iEY

No comments:

Post a Comment