म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : गोरेगावमधील नऊ वर्षांच्या या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे. शिवजयंतीनिमित्त, कल्याणमधील दुर्गाडी किल्ला ते जुन्नरमधील हे तब्बल १२० किलोमीटर्सचे अंतर ऋग्वेदने सुमारे साडेपंधरा तासांत सायकलवरुन पार केले. गिअर नसलेल्या सायकलचा वापर करूनही त्याने हा पल्ला यशस्वीपणे गाठला. आतापर्यंत २५ गड-किल्ल्यांची सैर, विविध ट्रेकमध्ये लीलया सहभागी झालेल्या चौथीतल्या ऋग्वेद गावडेने शिवजयंतीनिमित्त शिवरायांना आगळीवेगळी मानवंदना देण्याचे ठरविले. ऋग्वेदने शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता दुर्गाडी किल्ल्याहून सुरुवात केली. शनिवार, २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास त्याने शिवनेरी किल्ला गाठला. ही सायकल मोहीम हाती घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या निर्मितीचा साक्षीदार असलेल्या कल्याणच्या किल्ले दुर्गाडीपासून त्याने सुरुवात केली. या मोहिमेत मार्गदर्शक म्हणून गोरेगावच्या नागरी निवारा वसाहतीत राहणारे गिर्यारोहक-सायकलपटू, शैलेश सावंत यांची त्याला साथ लाभली. वाचा: ऋग्वेदला शुभेच्छा देण्यासाठी कल्याणमधील आर्यन बराटे (१२) सायकलपटूने प्रारंभी १८ किमी अंतरापर्यंत सायकलवरून त्याला सोबत केली. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात कल्याण, माळशेज मार्गाने सायकल चालविताना विविध आव्हाने होतीच, असे त्याचे वडील संतोष गावडे सांगतात. ग्राफिक डिझायनर असलेले गावडे हे स्वतः गिर्यारोहण करतात. ऋग्वेददेखील लहानपणापासून त्यांच्या सोबत येत आहे. मल्लखांब खेळत असलेल्या ऋग्वेदसमोर करोनामुळे सराव कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला होता. म्हणून त्याने योगासने करतानाच सायकल चालविणे सुरू केले. वाचा: ऋग्वेदने सायकल चालविण्याचा सराव हळूहळू वाढविताना तो १०० किमीपर्यंत नेला. त्यावेळी संतोष गावडे, शैलेश सावंत असे त्याच्यासोबत असायचे. त्यानंतर सराव पक्का झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी मोहीम पक्की केली गेली. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी ही मोहीम हाती घेण्यात आली. रात्रीच्या अंधारात सायकल चालवताना वाहनांचा डोळ्यांवर येणारा प्रकाश, कल्याण ते माळशेज घाट पायथ्यापर्यंतचा चढ, घाटमार्ग, गणेश घाटात कडक उन्हात सायकल चालवत असताना, खडीचा उतार पार करणेदेखील आव्हानात्मक होते. या मोहिमेत संदेश राणे, अरुण बराटे यांनीही मोलाची भूमिका पार पाडली. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37L9nxa
No comments:
Post a Comment