Breaking

Sunday, February 28, 2021

राज्यात तरुणांमध्ये सर्वाधिक करोना संसर्ग; 'ही' आहेत कारणं https://ift.tt/3qc6xbb

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामध्ये ३१ ते ४० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. मात्र त्याचवेळी २१ ते ३० या वयोगटामध्येही संसर्गाच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसते आहे. अनलॉकची प्रक्रिया झाल्यानंतर घराबाहेर वेगवेगळ्या कारणांनी जाणाऱ्या, खेळाच्या तसेच भेटीगाठीच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या युवावर्गामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढून ३ लाख ५३ हजार ५३४ इतके नोंदवण्यात आले आहे. तर ३१ ते ४० या वयोगटामध्ये ही संख्या ४ लाख ५२ हजार १६० इतकी आहे. वाचा: ४१ ते ५० या वयोगटामध्ये संसर्गाचे प्रमाण हे ३ लाख ८७ हजदार ८३ इतके नोंदवण्यात आले आहे. हे प्रमाण २१ ते ३० वयोगटाच्या तुलनेमध्ये अधिक असले तरी वैद्यकीयतज्ज्ञांनी युवावर्गामधील वाढत्या संसर्गाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मार्च ते डिसेंबर या कालावधीत या प्रमाणामध्ये वाढ झाली नव्हती. ऑगस्टमध्ये या वयोगटामध्ये रुग्णसंख्या वाढलेली दिसत होती. मात्र नियमांचे कसोशीने पालन केल्यानंतर या रुग्णसंख्येमध्ये घट झाली. आता जितकी नोंद झाली आहे, तितके प्रमाण वाढलेले दिसत नव्हते. ...अशी आहे स्थिती सरकारने दिलेल्या अहवालामध्ये शून्य ते १० वयोगटामध्ये ७१ हजार ६८० रुग्णांची नोंद झाली असून, ही रुग्णसंख्या ३.३३ टक्के नोंदवण्यात आली आहे. २१ ते ३० या वयोगटामध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण १६.४३ टक्के इतके आहे. ३१ ते ४० या वयोगटामध्ये ही संख्या २१.०२ टक्के तर ४१ ते ५० या गटामध्ये १७.९९ टक्के लोकसंख्येची नोंद झाली आहे. वयोगट - रुग्णसंख्या - टक्केवारी ५१ ते ६० - ३५१३२९ -१६.३३ टक्के ६१ ते ७० - २४०१६९ - ११.१६ टक्के ३१ ते ४० - ४५२१६० - २१.०२ टक्के ४१ ते ५० - ३८७०८३ - १७.९९ टक्के ७१ ते ८० - ११५९३६ - ५.३९ टक्के वाचा: शंभरीच्या पुढील रुग्णांची नोंद शंभर वर्षापुढील करोना रुग्णांचीही राज्यामध्ये नोंद झाली आहे. ही रुग्णसंख्या २९ इतकी आहे. त्यामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. राज्यात आतापर्यंत २१ लाख ५१ हजार ४५६ रुग्णसंख्या आतापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे नोंदवली आहे. पुरुषांमध्ये करोनाचे प्रमाण ६१ टक्के तर महिलांमध्ये ३९ टक्के इतके आहे. निगेटीव्ह आलेल्या चाचण्यांचे प्रमाण ८५ टक्के असून तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ टक्के आहे. राज्यात एकूण एक कोटी ६१ लाख ६९ हजार ८१६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ८५.११ टक्के नमुने निगेटिव्ह आले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sOgIV5

No comments:

Post a Comment