Breaking

Sunday, February 28, 2021

शिवसेनेच्या 'या' खेळीमुळे भाजपमध्ये खदखद; संघर्ष वाढणार https://ift.tt/3b0BVoA

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पालिका स्थायी समितीच्या निधी वाटपातील भेदभावामुळे भाजपकडून यापुढे विरोधक म्हणून अधिक आक्रमक भूमिका बजावली जाणार आहे. स्थायी समितीच्या निधीतून केवळ ६० कोटी रुपये निधीवर बोळवण झाल्याने भाजपमध्ये अधिकच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. परिणामी, पुढील कालावधीत आणि भाजपमधील दरी आणखीनच रुंदावत जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून पालिकेत शिवसेना आणि भाजपमधील संघर्षास दिवसेंदिवस अधिकाधिक धार येत आहे. दरवर्षी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून नगरसेवक विकासनिधी आणि स्थायी समितीस किती निधी पुरविला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. यंदा, करोनाच्या पार्शवभूमीवर एकूणच विकासनिधी किती उपलब्ध होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, त्यामधील स्थायी समितीतील निधीच्या वाटपाच्या घडामोडीत भाजपच्या वाट्यास इतर पक्षांच्या तुलनेत फारच कमी रक्कम आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वाचा: स्थायी समितीच्या वाट्यास आलेल्या ६५० कोटींपैकी शिवसेनेस ५२ टक्के, म्हणजे २३३ कोटी रु. एवढी रक्कम प्राप्त होणार आहे. तर, भाजपाची केवळ ६० कोटी रुपयांवर बोळवण झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे कमी नगरसेवक असूनही त्यांना मिळालेला निधी तुलनेने अधिक ठरला आहे. पुढील वर्षी पालिका निवडणूक असल्याने त्या संघर्षास अधिक वेग येण्याचीही शक्यता आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षांत वादविवाद, संघर्ष झडत असले, तरीही उभय पक्षांमधील समन्वयदेखील अनेकदा दिसला आहे. मात्र, यापुढील कालावधीत याप्रकारे समन्वयाचे धोरण राखले जाईल का, याविषयीही प्रश्नचिन्ह आहे. वाचा: स्थायी समितीतील निधी वाटप करताना ते समान असणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. या एकूण वाटपामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांना विकास निधीसाठी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार जवळपास साडेतीन ते चार कोटी रुपये उपलब्ध होतील, तर भाजपच्या नगरसेवकांना सुमारे दीड कोटींचा निधी मिळणार आहे. हा फरक प्रचंड असून त्याचा थेट परिणाम विभागातील विकासकामांवर दृश्य स्वरूपात होणार आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागातील विकास निधीचा वापर हा कळीचा मुद्दा ठरला आहे. म्हणूनच येत्या कालावधीत दोन्ही पक्षांमध्ये विस्तवदेखील जाणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3e3g5T4

No comments:

Post a Comment