Breaking

Saturday, February 27, 2021

करोनाची चाचणी न केल्यास गुन्हे; पोलिस आयुंक्तांनी दिले निर्देश https://ift.tt/3uH8Fe8

म.टा. प्रतिनिधी, करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी न केल्यास थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना दिले. बाधितांच्या संपर्कात आल्यानंतरही संपर्कातील नागरिक चाचणी करीत नाहीत. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी केली का, त्याचा अहवाल काय आला, अहवाल निगेटिव्ह नसतानाही तो शहरात फिरत आहे का, याची माहिती घेण्यासह चाचणी न करणाऱ्यांविरुद्ध साथरोग कायदा व आदेशाचे उल्लंघन आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. 'मिनी लॉकडाउन'दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये व नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह तब्बल अडीच हजार पोलिसांचा ताफा शनिवारी उपराजधानीतील रस्त्यांवर होता. शनिवारी पोलिसांनी रात्री साडेनऊपर्यंत विविध ठिकाणी ६६ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून ११ हजार ६०० रुपयांचा वसूल केला. मास्क न घालणाऱ्या २३ नागरिकांकडून सहा हजार रुपये तर सुरक्षित वावरचे पालन न करणाऱ्या ४३ नागरिकांकडून ५,६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनीही मास्क न घालणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. मात्र, या कारवाईची संख्या वृत्त लिहिपर्यंत कळू शकली नाही. वाचाः शनिवार आणि रविवारी असलेल्या बंदच्या बंदोबस्ताची आखणी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारीच केली. शनिवारी सकाळपासूनच शहरातील मुख्य चौकांसह विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. बंदोबस्तात गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह आठ पोलिस उपायुक्त, ७२ पोलिस निरीक्षक, २३७ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, २,४६५ पोलिस कर्मचारी, ३४१ महिला पोलिस कर्मचारी शहरातील विविध भागांत तैनात होते. प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी, फिक्स पॉइंट लावण्यात आले. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली. याशिवाय, सहा दंगल नियंत्रण पथके व दोन शीघ्रकृती पथके पोलिस मुख्यालय व नियंत्रण कक्षात सज्ज होते. वाचाः तर कठोर निर्णय : पालकमंत्री करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन व पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सुरक्षित वावरचे पालन करण्यासह मास्क घालावा. नागरिकांनी नियमांचे काटेकार पालन न केल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. यांनी दिला. व्हरायटी चौकातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतल्यानंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री या नात्याने नागरिकांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. नागरिकांनीही प्रशासनांच्या सूचनेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पोलिस आयुक्तांसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाचाः


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uxKJtI

No comments:

Post a Comment