मुंबई: 'बिग बॉस ७' चा उपविजेता अभिनेता एजाज खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. एजाजला ने ड्रग्स प्रकरणी अटक केली. या प्रकरणी ३० मार्चला एजाज खानला मुंबई एअरपोर्टवरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यानी तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर केली आहे. पण एजाज खाननं या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. NCB कडून एजाज खानला ३१ मार्चला सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याआधी त्याचं मेडिकल चेकअपही करण्यात आलं. NCB न्यायालयाकडून एजाज खानच्या रिमांडची मागणी करण्याची शक्यता आहे. एजाज खानचं ड्रग्स सप्लायर शादाब बटाटा याच्याशी संबंध असल्याचं NCB च्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मागच्याच आठवड्यात शादाबला २ कोटींच्या ड्रग्ससह NCB ने अटक केली होती. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर अटक झालेल्या एजाज खाननं मात्र आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच NCB ने लावलेले सर्व आरोप त्यानं फेटाळले आहेत. एजाज म्हणाला, 'माझ्या घरी फक्त ४ झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. ज्या गोळ्या माझी पत्नी घेते. गर्भपातानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तिला या गोळ्या दिल्या जात आहेत.' याआधी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं की, 'शादाब बटाटा केसमध्ये एजाज खानचा संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे निश्चितच त्याच्यावर गंभीर आरोप आहेत. त्याची चौकशी सुरू असून यासंबंधी एजाजचं स्टेटमेंट घेतलं जात आहे.' मंगळवारी राजस्थानवरून मुंबईला परतला होता. त्यावेळी NCB ने त्याला एअरपोर्टवरूनच ताब्यात घेतलं होतं. एजाज खानचे ज्याच्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे तो शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sFe9on
No comments:
Post a Comment