Breaking

Monday, March 29, 2021

फारूक अब्दुल्लांना करोना, अब्दुल्ला कुटुंब सेल्फ आयसोलेशनमध्ये https://ift.tt/31yYvz7

श्रीनगरः नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ( ) यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी याच महिन्यात करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. फारूक अब्दुल्ला यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून दिली. यानंतर उमर अब्दुल्लाही सेल्फ आयसोलेशनमध्ये गेले आहेत. माझे वडील करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्या करोनाची लक्षणं आढळून आली आहेत. सर्वांच्या चाचण्या होत नाही तोपर्यंत मी आणि कुटुंबातील सर्व सदस्य सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. गेल्या काही दिवसांत जे कोणी आमच्या संपर्कात आले असतील त्यांनीही काळजी घ्यावी, असं उमर अब्दुल्ला यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. डोस घेतल्याचा फोटो ट्वीट केला होता उमर अब्दुल्ला यांनी २ मार्चला फारूक अब्दुल्ला यांचा करोनावरील लसीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट केला होता. श्रीनगरच्या एसकेआयएमएसमधील डॉक्टर, नर्स आणि स्टाफचे आभार. ८५ वर्षांच्या आपल्या वडिलांना आणि आईला करोनावरील लसीचा पहिला डोस दिला आहे. आपल्या वडिलांना काही आजार आहेत, असं उमर अब्दुल्ला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. खर्गेंना दिला होता सल्ला ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असं उमर अब्दुल्ला म्हणाले होते. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना लस घेणार की नाही? असा प्रश्न करण्यात आला होता. मी ७० वर्षांचा आहे आणि माझ्या पेक्षा तरुणांना अधिक जगायचं आहे. त्यांना लस दिली गेली पाहिजे. मी काय १०-१५ वर्षे असेल, असं खर्गे म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31tpYC3

No comments:

Post a Comment