Breaking

Monday, March 29, 2021

व्हिडिओः श्वेता त्रिपाठीनं सांगितली मोडलेल्या लग्नाची गोष्ट https://ift.tt/3u5FgJM

मुंबई: बिग बॉस फेम टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. श्वेता अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेतानं तिच्या अयशस्वी लग्नांचा मुलांवर काय आणि कसा परिणाम झाला यावर भाष्य केलं. श्वेतान दोन लग्नं केली आणि तिची दोन्ही लग्न काही काळानं मोडली. वयाच्या १९ व्या वर्षी श्वेतानं राजा चौधरीशी लग्न केलं होतं. तर तिचं दुसरं लग्न २०१३ मध्ये अभिनव कोहलीशी झालं होतं. पण तिची दोन्ही लग्न जास्त काळ टिकू शकली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेतानं तिची लग्न तुटण्याचं कारण सांगितलं. तसेच दोन वेळा लग्न तुटल्यानंतर त्याचा मुलांवर काय परिणाम झाला याबद्दलही श्वेता यावेळी बोलली. 'एवढ्या कमी वयात अनेक समस्यांचा सामना केल्यानंतर माझ्या मुलांनी कधीच धीर सोडला नाही. नेहमीच हसत हसत त्यांनी सर्व समस्यांचा समाना केला. ते दोघं त्यामुळे नाराज राहिले नाहीत' असं या मुलाखतीत श्वेतानं सांगितलं. श्वेता म्हणाली, 'मी जेव्हा माझ्या मुलांकडे पाहते त्यावेळी मला अनेकदा असं जाणवतं की, ते दोघंही आपल्या भावना माझ्यापासून लपवत आहेत. पलक त्यावेळी ६ वर्षांची होती. जेव्हा तिनं तिचे वडील मला मारहाण करत असलेलं पाहिलं होतं. पलकनं सुद्धा माझ्यासोबत बरंच दुःख झेललं आहे. माझा मुलगा आता ४ वर्षांचा आहे पण त्याला पोलीस न्यायाधीश अशा सर्व गोष्टींची माहिती आहे.' श्वेता सांगते, 'कधी कधी मला हे समजत नाही की, या सगळ्या समस्यापासून माझ्या मुलांना मी कसं वाचवू. कसं त्यांचं संरक्षण करू. या वयात ते ज्या समस्यांमधून जात आहेत. त्याला केवळ मी जबाबदार आहे. मी माझ्या आयुष्यात चुकीच्या व्यक्तीला निवडलं त्यामुळे त्यांना हे सर्व सहन करावं लागत आहे. ते दोघंही कितीही दुःखात असले तरीही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं.' श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचा २००७ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर राज चौधरी आपली मुलगी पलकला जवळपास १३ वर्षांनंतर भेटला. ज्याचे फोटो सोशल मीडयावर व्हायरल झाले होता. दरम्यान श्वेता तिवारी मागच्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आहे. जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशननंतर श्वेताचा हॉट लुक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2O5HysZ

No comments:

Post a Comment