नवी दिल्लीः देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ५६ हजारांवर नवीन रुग्ण ( ) आढळून आले आहेत. ही संख्या सोमवारच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी आहे. या काळात २७१ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पण करोना रुग्णांची एकूण संख्या १.२० लाखांवर गेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि पंजाबसह ८ राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे देशात ६ कोटी ११ लाख १३ हजारांहून अधिक जणांना करोनाची लस दिली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केलीय. गेल्या २४ तासांत करोनाचे ५६,२११ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार देशात करोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ही १ कोटी २० लाख ९५ हजारांवर गेली आहे. या काळात २७१ जणांचा मृत्यू झाला. यानुसार देशातील मृतांची एकूण संख्या १ लाख ६२ हजार ११४ इतकी झाली आहे. देशात सध्या ५ लाख ४० हजार ७२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाचे २४ कोटी २६ लाख ५० हजारांवर चाचण्या झाल्या आहेत. ज्यापैकी सोमवारी ७,८५,८६४ नमुन्यांची चाचणी केली गेली, अशी माहिती आयसीएमआरने दिलीय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31wwate
No comments:
Post a Comment