Breaking

Monday, March 29, 2021

एकट्या तरुणाला पाच-सहा जणांच्या टोळक्याने घेरले आणि... https://ift.tt/39pIe3V

जयंत सोनोने । शहरातील अमरावती-परतवाडा मार्गावरील भागातील यश बार परिसरात सहा जणांनी एका तरुणाला मारहाण केली. जुन्या वादातून लोखंडी रॉड, काठ्या, चाकू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात भूषण पोहकर (वय २१), नामक युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे. वाचा: अमरावती शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत हत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २७ तारखेला अमरावती शहरातील नवसारी परिसरातील यश बार समोर तरुणाला मारहाणीची घटना घडली. आरोपींनी तरुणाला इतकी मारहाण केली की तो काही वेळ मरणासन्न अवस्थेत खाली पडला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या भूषणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cAOMhY

No comments:

Post a Comment