Breaking

Friday, March 26, 2021

नांदेडमधील 'त्या' दरोड्याच्या गुन्ह्याचा लागला छडा,तिघांच्या मुसक्या आवळल्या https://ift.tt/3lSJxgI

नांदेड: नांदेडच्या एमआयडीसी परिक्षेत्रातील ‘डिजॉन’ रेडिमेड कपड्यांच्या गोदामाचे शटर वाकवून गोदामातील सूट, शेरवानी, ब्लेजर व हेवी जीन्स आदी सुमारे २२ लाख रुपयांचा माल चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. याशिवाय, नांदेड ग्रामीण पोलिसांनी २४ मार्च रोजी मध्यरात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या आरोपी चोरट्यांकडून १८ लाख रूपयांच्या मुद्देमालासह सदर गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नांदेडच्या एमआयडीसी परिक्षेत्रामधील ‘डिजॉन’ कॅज्युअल्सचे मालक, व्यवस्थापक, कर्मचारी तसेच नोकर नेहमीप्रमाणेच १६ मार्च रोजी सायंकाळी उशिरा रेडिमेड कपड्यांचे गोदाम व रेडिमेड कपड्याचे दुकान बंद करून घरी गेले. १७ मार्च रोजी पहाटे सव्वातीन ते सव्वाचार वाजेदरम्यान चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. त्याचवेळी, अज्ञात चोरट्यांनी गोदामात तब्बल एक तासभर थांबून गोदामातील सुट, शेरवानी, ब्लेजर, हेवी जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस, दोन संगणक आणि काउंटरमधील रोख ५०० रुपयांसह सुमारे २१ ते २२ लाख रूपये किंमतीचे रेडिमेड ड्रेस चोरून नेले, अशी माहिती ‘डीजॉन’ कॅज्युअल्सचे मालक दीपक प्रेमचंदानी व व्यवस्थापक खान इरफान अली यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी डॉ. सिध्देश्वर भोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शेख असद, गणेश होळकर व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी गेले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनानुसार, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी १८ मार्च रोजी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31nonOb

No comments:

Post a Comment