Breaking

Friday, April 2, 2021

मतदानाआधी उमेदवाराची भाजपत उडी, EC आज देणार निर्णय https://ift.tt/2PVA3Fj

गुवाहाटी : दरम्यान (BPF) च्या एका उमेदवारानं चक्क मतदानाच्या काही दिवस अगोदर पक्षाला चांगलाच धक्का दिलाय. बीपीएफचे उमेदवार यांनी गुरुवारी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. ते बीपीएफचे तामुलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. इथे तिसऱ्या टप्प्यात अर्थात ६ एप्रिल रोजी ४० मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. बीपीएफकडून या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय. आज (शनिवारी) या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. रंगजा खुंगूर बासुमतरी हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. बुधवारी मध्यरात्री त्यांनी भाजपचे नेते यांची भेट घेतली. यानंतर, आपण बीपीएफ उमेदवाराची भेट घेतली असून ते लवकरच भाजपत दाखल होणार असल्याचं ट्विट सरमा यांनी केलं होतं. पक्षानं निवडणुकी दरम्यान आपण अडचणीत असताना आपली कोणतीही मदत केली नाही. बीपीएफचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असला तरी तांत्रिक कारणामुळे आता उमेदवारी मागे घेता येणार नाही. परंतु, आता आपण भाजपचे सहकारी यूपीपीएलचे उमेदवार लेहो राम बोरो यांचं समर्थन करणार आहोत, असं बासुमतरी यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय. आसाममध्ये बीपीएफ काँग्रेसचा सहकारी पक्ष आहे. भाजपकडून धमकी मिळाल्यानं बासुमतरी गायब झाले होते, असा दावा काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी केलाय. 'भारतात आजवर निवडणुकी दरम्यान अशा पद्धतीच्या अनैतिक घटना घडल्या नव्हत्या. भाजप चुकीच्या पद्धतीनं जिंकू पाहतंय. भाजपचा लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही' असं म्हणत मनिष तिवारी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणीही तिवारी यांनी केलीय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31HZ6yr

No comments:

Post a Comment