नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सुरक्षारक्षकांच्या कामाचं कौतुक केलंय. एका चालत्या रेल्वेतून रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोसळलेल्या वृद्ध व्यक्तीला वाचवताना आपला जीव धोक्यात टाकताना एक या व्हिडिओत दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांनीही पोलीस कर्मचाऱ्यावर केलाय. 'राजस्थानच्या सवाई माधोपूर स्टेशनवर एक वयोवृद्ध प्रवाशाला ड्युटीवर तैनात सुरक्षारक्षकाद्वारे त्वरीत कारवाई करताना रेल्वेखाली येण्यापासून वाचवण्यात आलं. आपल्या संपूर्ण सेवाभावासह आपल्या कर्तव्याचं पालन करणाऱ्या आपल्या सुरक्षा रक्षकांचा आम्हाला अभिमान आहे' असं व्हिडिओ शेअर करताना पीयूष गोयल यांनी म्हटलंय. आतापर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर जवळपास ४० हजार वेळा पाहिला गेलाय. जनतेकडूनही पोलिसांच्या कामाचं, त्यांच्या दक्षतेचं कौतुक होत असल्याचं या व्हिडिओवरील कमेंटसमधून दिसून येतंय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2R427Hm
No comments:
Post a Comment