जयंत सोनोने । रुग्णालयात असलेल्या आजोबांसाठी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना कारला झालेल्या अपघातात नातवाचा व जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. कुऱ्हा-आर्वी रोडवर शुक्रवारी ही घटना घडली. भूषण चाफले (वय २४) व मिलिंद पिंपळकर ( वय ३२) अशी मृतांची नावं आहेत. कुऱ्हापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्वी येथील एका रुग्णालयात भूषण चाफले यांचे आजोबा दाखल आहेत. त्यांना रक्ताची गरज असल्याची माहिती डॉक्टरांनी भूषण यांना दिली. सध्या राज्यासह जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम व समारंभांवर बंदी असल्याने रक्तदान शिबिरे सुद्धा कमी झाली आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळं रक्तासाठी भूषण व मिलिंद हे दोघे आर्वी वरून अमरावती येथील रक्तपेढीत आले होते. तिथून रक्ताची पिशवी घेऊन परतत असताना त्यांच्या कारला (क्र. एम. एच. ३२ ए.एच. ५६१७) कुऱ्हा-आर्वी रोडवर भीषण अपघात झाला. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वाचा: अमरावतीहून परतत असताना भरधाव वेगात असलेली त्यांची कार कुऱ्हापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यावरून शेतात घुसली. या अपघातात जबर जखमी होऊन दोघांचाही मृत्यू झाला. कुऱ्हा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ईश्वर वर्गे व सहकारी करीत आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PwJU4D
No comments:
Post a Comment