मुंबईः राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री यांनीही विरोधकांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा देताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील देशांनी केलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला होता. तसंच, जगभरातील देशांनी लॉकडाऊन लावले असले तरी त्यांना आपापल्या जनतेसाठी आर्थिक पॅकेज दिली आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला हाणला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक ट्वीट केलं आहे. 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत त्यास सलाम,' असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. रुग्णालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांची २३ मार्चला कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याआधी पर्यावरण मंत्री यांचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39CS02F
No comments:
Post a Comment