Breaking

Tuesday, April 27, 2021

अकोला: शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला मारहाण https://ift.tt/2R2vJoC

: अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळसूर येथे दोन गट एकमेकांना भिडले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी परस्परांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशिरा सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सस्ती जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार यांना शिवीगाळ केली. तसेच पाच जणांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी शिवाजी काळे, गौरव काळे, पंढरी गडदे, संतोष काळे, आतीश काळे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद सदस्य संदीप सरदार यांच्या गटातील दोघा जणांनी घरात घुसून विनयभंग केल्याची तक्रार महिलेने केला आहे. यावरून जिल्हा परिषद सदस्य संदीप तुकाराम सरदार, प्रमोद मधुकर पवार यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांतील एकूण सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. केल्याच्या प्रकरणाचा तपास बळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत असून, विनयभंग प्रकरणाचा तपास चान्नी पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे संदीप सरदार आणि भाजपचे काळे यांच्यात काल रात्रीच्या सुमारास चान्नी बसस्थानकावर वाद झाले. वाद सुरू असताना संदीप सरदार यांना मारहाणही झाली. भाजप गटातील लोकांनी मारहाण केल्याची तक्रार चान्नी पोलीस ठाण्यात देण्यात आली. दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे चान्नी परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस ठाण्यात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gJyTs1

No comments:

Post a Comment