Breaking

Tuesday, April 27, 2021

...म्हणून आधी रक्तदान करा, नंतर लस घ्या; विजय वडेट्टीवारांचे आवाहन https://ift.tt/3xFw9lE

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा १ मे पासून सुरू होणार असून १८ वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे करोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी मंगळवारी केले. वाचा: रुग्णालयांमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात असल्याने अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता आहे. त्यातच करोना लस घेतल्यावर ६० दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर करोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या, असे वडेट्टीवार म्हणाले. २८ एप्रिलनंतर cowin.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करा. करोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रक्ताचा तुटवडा पाहून सामाजिक भान जपून रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3eRlqvV

No comments:

Post a Comment