म. टा. प्रतिनिधी, सध्या राज्यासह मुंबईत करोनाचा कहर पुन्हा वाढत असताना या आजाराशी दोन हात करताना लस, सुरक्षित वावर आणि मास्क यांच्यावरच भिस्त आहे. अशा स्थितीत करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. मध्य, पश्चिम रेल्वेवर फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत चार हजारांहून अधिक वाढ झाली आहे. प्रवाशांच्या या बेफिकिरीमुळे वैद्यकीय क्षेत्रावरील ताण वाढत आहे. लसीकरण आधी आणि नंतर मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सर्वच स्तरांतून सांगण्यात येते. शक्य त्या पद्धतीने, उपलब्ध सर्व माध्यमांतून याबाबत जनजागृतीही होते. मात्र आजही मास्क न वापरता प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रवाशांना समजवण्यासाठी नानविध क्लृप्त्या उपयोगात आणण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे स्थानकांत मार्चमध्ये सहा हजार ९७२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, फेब्रुवारीमध्ये चार हजार १७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. फेब्रुवारीच्या तुलनेत तब्बल दोन हजार ८९५ प्रवाशांची भर मार्चमध्ये पडली आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांतदेखील अशीच स्थिती आहे. मार्चमध्ये सहा हजार प्रवाशांवर, तर फेब्रुवारीमध्ये चार हजार ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. फेब्रुवारी-मार्च या दोन महिन्यांत पश्चिम रेल्वेवरील विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १७ लाख २३ हजार १०० रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांत २१ लाख ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. रेल्वे स्थानकांवर विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांकडून १५०-२०० रुपये असा दंड आकारण्यात येतो. विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वे स्थानकांत महापालिकेकडून मार्शलची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विनामास्क प्रवाशांवर कारवाई मार्च : ६,००० फेब्रुवारी : ४,८०० पश्चिम रेल्वे मार्च : ६.९७२ फेब्रुवारी : ४,०१७
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cLBn6U
No comments:
Post a Comment