Breaking

Saturday, April 3, 2021

निधीवाटपावरून काँग्रेसची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानी https://ift.tt/3dvahju

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना, खासकरून काँग्रेसच्या ताब्यातील विभागाच्या मंत्र्यांचे निधी वाटपाबाबत असलेले आक्षेत तातडीने संपुष्टात आणावे, तसेच सरकारने किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांची मुंबईत शनिवारी भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे आरोप आणि अंबानी स्फोटके प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांच्यावरील कारवाईमुळे आघाडी सरकार विरोधकांच्या आरोपांच्या किटाळात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी मुंबईचा दोन दिवसांचा दौरा करून, पक्षातील मंत्री, नेत्यांशी शुक्रवारी रात्री विचारविनिमय केला. त्यानंतर शनिवारी नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' निवसस्थानी भेट घेतली. या बैठकीत प्रामुख्याने किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आघाडीचे प्रमुख नेते करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, निधी वाटपाबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांचे काही आक्षेप होते. ते मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती एच. के. पाटील यांनी दिली. आघाडीच्या किमान समान कार्यक्रमासाठी प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून त्याचा आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आघाडीच्या समन्वय समितीच्या व्यतिरिक्त एक समिती नेमण्यात येईल, जी किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेईल. केंद्राच्या कृषी कायद्याला काँग्रेसने विरोध केला असून ज्या राज्यात आपली सत्ता आहे, त्या राज्यात कृषी कायद्याला विरोध करणारा कायदा आणण्याच्या सूचना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिल्या होत्या. नुकतीच या विषयीच्या समितीची बैठक झाली. सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांनी जे काही आक्षेप घेतले होते, त्यावर न्यायालयाने गंभीर आक्षेप घेतले आहेत, असेही एच. के. पाटील म्हणाले. 'एकत्र बसून तक्रारी सोडवल्या पाहिजेत' सरकारमध्ये एकत्र असताना ज्या काही तक्रारी येतात, त्या एकत्र बसून सोडवल्या पाहिजेत. कर्जमाफीसारखा विषय समान कार्यक्रमाचा भाग होता. तो एकत्रितपणे सोडवला. आता करोनाकाळातील वीज बिलांच्या माफीबाबत सरकारला काही करता येईल याची चर्चा करावी लागेल, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PS2tjQ

No comments:

Post a Comment