पॅरिस: भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल लढाऊ विमान () खरेदीतील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे भूत पुन्हा एकदा बाहेर आले आहे. फ्रान्समधील एका वृत्तमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राफेलची निर्मिती करणाऱ्या डसॉल्टने या करारासाठी एका भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी मोठी रक्कम 'भेट' दिली. फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या या वृत्तामुळे खळबळ उडाली असून या करारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. फ्रान्समधील 'मीडियापार्ट'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, भारत आणि फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीबाबत वर्ष २०१६ मध्ये करार झाला. त्यानंतर डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला ही रक्कम दिली. वर्ष २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून 'गिफ्ट टू क्लाएंट' म्हणून रक्कम ट्रान्सफर करण्यात आली. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर कंपनीने ही रक्कम राफेल लढाऊ विमानांचे ५० मोठे 'मॉडेल' विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणत्याही विमानांची निर्मिती करण्यात आली नव्हती, असे मीडियापार्टच्या वृत्तात म्हटले आहे. तपास संस्थांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे कोणतीही उत्तरे नव्हती. डसॉल्टने ही मोठी रक्कम कोणाच्या खात्यावर, कोणाला दिली आणि का दिली याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही. या अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय कंपनीचे नाव याआधीदेखील वादात होते. भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये झाला होता. यामध्ये भारताने फ्रान्सकडून ३६ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानुसार काही विमाने भारतीय हवाई दलत दाखल झाली असून पुढील वर्षी सर्व राफेल विमाने भारताच्या ताफ्यात असतील. लोकसभा निवडणुकी दरम्यानही या करारात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39GrhSX
No comments:
Post a Comment