मुंबई: करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात चिंतेचं वातावरण आहे. देशभरात अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. महाराष्ट्रातही मागच्या काही दिवसांत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना करोना व्हायरसची लागण झालेली पाहयला मिळत आहे. तर दुसरीकडे अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार करोनाची लस घेताना दिसत आहे. अनेकांनी आपले फोटो आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशात ‘बड़े अच्छे लगते हैं’ फेम अभिनेता यांनीही करोनाची लस घेतली. पण लस घेताना रडतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. राम कपूर यांनी सोशल मीडियावर करोनाची लस घेतानाचा त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात आपण पाहू शकतो की, पीपीई किट घातलेली एक नर्स राम कपूर यांच्या बाजूला उभी आहे आणि त्यांना इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. पण जशी ती त्यांना इंजेक्शन देण्यासाठी जाते तसं राम कपूर जोर-जोरात ओरडायला सुरुवात करताना आणि रडताना दिसतात. इंजेक्शन पाहून लहान मुलांप्रमाणे रडणारे राम कपूर खरं तर मस्करी करत आहे. त्यांची पत्नी गौतमी लस देताना त्यांचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न करत आहे. राम यांना असं करताना पाहून तिलाही हसू येतं आणि ती त्यांना गप्प राहायला सांगते. त्यावर मस्करीत राम कपूर तिला गप्प राहायला सांगतात आणि नीट व्हिडीओ शूट कर असंही म्हणतात. राम कपूर यांना अशाप्रकारे रडताना पाहून बाकी लोकही त्यांच्याकडे पाहू लागतात. पण जेव्हा राम यांना समजतं की, बाकी लोकही आपल्याकडे पाहत आहेत तेव्हा ते म्हणतात मी तर मस्करी करत होतो. राम कपूर यांचा हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. त्यांचा हा मजेदार अंदाज त्यांच्या चाहत्यांना खूप आवडलेला दिसत आहे. अनेकांनी राम कपूर यांचा व्हिडीओ पाहून आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचं म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3unR9uw
No comments:
Post a Comment