नवी दिल्ली : छत्तीसगडच्या माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाल्यानं अवघ्या देशावर शोककळा पसरलीय. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आज छत्तीसगडला भेट देत आहेत. गृहमंत्री जगदलपूरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील तसंच जखमी जवानांची रुग्णालयात भेट घेणार आहेत. विमानतळावर दाखल झालेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री हेदेखील विमानतळावर दाखल झाले होते. रविवारी झालेल्या बीजापूर माओवादी हल्ल्यात २२ जवान शहीद झाले तर एक जवान बेपत्ता आहे. ३२ जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात जवानांकडून २५-३० नक्षलवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आल्याचं समजतंय. मात्र, नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. गृहमंत्र्यांचा दौरा गृहमंत्री अमित यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार, ते सकाळी १०.४० वाजता जगदपूर विमानतळावर दाखल होतील. पोलीस लाईन जगदलपूरमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते बीजापूरकडे रवाना होतील. गृहमंत्री अमित शहा सुरक्षदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेणार आहेत. नक्षल प्रभावित बासागुडा सीआरपीएफ कॅम्पमध्येही ते जातील. तसंच रायपूरमध्ये जखमी जवानांची भेटही ते घेणार आहेत. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता ते दिल्लीकडे रवाना होतील. निवडणूक दौरा अर्ध्यावरच सोडला माओवादी हल्ल्याची बातमी समजल्यानंतर आपला आसामचा निवडणूक दौरा अर्ध्यावरच रद्द करत गृहमंत्री दिल्लीला परतले होते. अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. सोबतच त्यांनी सीआरपीएफ पोलीस महासंचालकांना तत्काळ बीजापूर पोहचण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीमध्येही बैठक या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्येही गृहमंत्र्यांनी रविवारी रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत आयबीचे संचालक, गृह सचिव, सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं या घटनेवर छत्तीसगडच्या पोलीस महासंचालकांच्या विस्तृत अहवाल मागवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39IfeEz
No comments:
Post a Comment