ग्वालियर: क्रिकेट मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये होणारे राडे काही नवे नाहीत. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दिग्गज खेळाडूंमध्ये सामना सुरू असताना राडे होत असतात. अनुभवी आणि प्रशिक्षण असलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूमध्ये वाद होत असतील तर देशांतर्गत तसेच स्थानिक पातळीवर काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. वाचा- क्रिकेटच्या मैदानावर अशीच एका धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथ झालेल्या एका क्रिकेट सामन्यात एका क्रिकेटपटूने दुसऱ्या केली. ही मारहाण इतकी गंभरी होती की क्रिकेटपटू बेशुद्ध झाला. वाचा- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅच दरम्यान २३ वर्षीय फलंदाजाने दुसऱ्या खेळाडूला मारहाण केली. पोलिस अधिक्षक रामनरेश पचौरी यांनी सांगितले की, सामन्यात संजय पालिया हा खेळाडू फलंदाजी करत असताना ४९ धावांवर बाद झाला. संजयचा कॅच सचिन पराशर या खेळाडूने घेतला. अर्धशतक पूर्ण न करता आल्याच्या राग अनावर झाल्याने संजयने सचिनला बॅटने मारहाण केली. सचिनला झालेली मारहाण इतकी गंभीर होती की तो बेशुद्ध झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. या संदर्भात पोलिसांनी संबंधित फलंदाजावर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मेला मैदान येथे हा सामना सुरू होता. सचिनने ४९ धावांवर जेव्हा कॅच घेतला तेव्हा संजयला राग अनावर झाला. त्याला ५० धावा करण्यासाठी फक्त एक रन गरजेची होती. तो पळत सचिनच्या जवळ केला आणि बॅटने डोक्यावर मारण्यास सुरूवात केली. अन्य खेळाडूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. सचिनवर रुग्णालयात उपचार सुरू असून तो अद्याप बेशुद्ध आहे. दरम्यान ज्या क्रिकेटपटूने मारहाण केली तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, असे पचौरी यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39HWHs9
No comments:
Post a Comment