नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जोरदारपणे सुरू होतेय. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मे पासून लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी बुधवार (२८ एप्रिल) पासून '' हे लसीकरण नोंदणी प्लॅटफॉर्म खुलं करण्यात आलंय. बुधवारी सायंकाळी ४.०० वाजल्यापासून नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी सुरू झालीय. मिळालेल्या माहितीनुसार, 'कोविन'वर झाल्यानंतर जवळपास १.३३ कोटींहून अधिक लोकांनी लस घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केलीय. उल्लेखनीय म्हणजे, राज्य आणि खासगी लसीकरण केंद्रांकडे उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्याच्या आणि स्लॉटच्या आधारावर नागरिकांना लसीकरणासाठी वेळ दिली जाणार आहे. लसीकरणाचा साठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानं आणि राजस्थानात मात्र १ मेपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार नाही. या राज्यांत १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिस्ट्रेशनला सुरुवात झाल्यानंतर काही वेळ वेबसाईटवर काही त्रुटी आढळून आल्या. परंतु, त्या दूर झाल्यानंतर कोविन या वेबसाईटवर एका मिनिटाला जवळपास २७ लाख हीटस् मिळाले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांसहीत करोना योद्ध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आलं. तर ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं होतं. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना https://ift.tt/3s3Kuo9 वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3u2xoJt
No comments:
Post a Comment