Breaking

Wednesday, April 28, 2021

भारतात करोनाचे संकट; 'या' छोट्या देशानेही पाठवली मदत https://ift.tt/3e340gq

पोर्ट लुईस: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला जगभरातून मदतीचा हात दिला जात आहे. काही विकसित देशांनी भारताला मदत पोहचवण्याची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे एका छोट्याशा देशानेही मदत पाठवत करोनाच्या लढाईत भारताला साथ दिली आहे. मॉरिशसने भारताला २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स पाठवले आहेत. भारतीय परराष्ट्र खात्याने या संकटाच्या काळात केलेल्या मदतीसाठी मॉरिशसचे आभार मानले आहेत. मॉरिशसने भारताला २०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स पाठवल्यामुळे याचा फायदा अनेक रुग्णांना होणार आहे. भारत आणि मॉरिशसमध्ये अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. मात्र, मॉरिशसवर सध्या चीनचा दबाव असल्याचे म्हटले जाते. त्यानंतरही मॉरिशसने भारताला मदत केली आहे. वाचा: रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे मॉरिशस हिंदी महासागरात सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा देश आहे. भारतासोबत मॉरिशसचे व्यापार संबंध असून अनेक महत्त्वाचे करार दोन देशांदरम्यान झाले आहेत. या भागातून दरवर्षी अब्जावधींचा व्यापार होतो. आफ्रिका खंडाच्याजवळ हा देश असल्यामुळे हिंदी महासागरात हा देश महत्त्वाचा आहे. या देशाजवळच रेयूनियो बेट आहे. या बेटावर फ्रान्सचा ताबा आहे. फ्रान्सने या बेटावर एक मोठा लष्करी तळ उभारला आहे. मॉरिशसच्या उत्तर-पूर्व भागात डिएगो गार्सिया आहे. या ठिकाणी अमेरिका आणि ब्रिटनचा लष्करी तळ आहे. वाचा: इतर देशांकडून मदत फ्रान्सकडून भारताला आठ ऑक्सिजन जनरेटर मिळणार आहेत. त्याद्वारे प्रति जनरेटरमधून पुढील किमान १० वर्षांसाठी २५० खाटा असलेल्या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करता येण्याची क्षमता आहे. पहिल्या खेपमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे पाच कंटेनर पाठवण्यात येत आहे. त्याद्वारे एका दिवसात किमान १० हजार रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येऊ शकतो. भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील 'गिलियड सायन्स' (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला. भारतात करोनाची वाढती साथ लक्षात घेता कंपनीकडून रेमडेसिवीरच्या किमान ४.५ लाख कुप्या ( (India gets free Remdesivir) मोफत देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली असून त्या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PDbD3W

No comments:

Post a Comment