नवी दिल्ली: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक असा विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे आज दोन-तीन महिन्यांनी देखील कौतुक केले जातय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाचे कौतुक केले आहे. वाचा- अनुभवी खेळाडू संघात नसताना भारताच्या युवा खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली होती. काही खेळाडूंनी तर पदार्पणाच्या सामन्यात विक्रम गेले. भारतीय संघाच्या या यशातील अनेक हिरोपैकी एक म्हणजे होय. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत सुंदरने पदार्पणाचा सामना खेळला. या सामन्यात भारताने ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि मालिका २-१ने जिंकली. मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाचा ३२ वर्षानंतर कोणी तरी पराभव केला आणि ही कामगिरी भारताच्या या युवा शिलेदारांनी केली होती. वाचा- या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात ६२ धावा आणि दुसऱ्या डावात २९ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. त्याने पंत सोबत सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागिदारी केली होती. भारतीय संघातील हा खेळाडू आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सुंदरने त्याच्या कुत्र्याचे नाव गाबा असे ठेवले आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात असलेल्या या क्रिकेट मैदानाचे नाव कुत्र्याला ठेवल्याचे सुंदरने सोशल मीडियावर म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dOOe7N
No comments:
Post a Comment