Breaking

Sunday, April 4, 2021

चंद्रकांत पाटील नागपुरातून निवडणूक लढण्याची शक्यता; 'या' नेत्याचा दावा https://ift.tt/3uo2T0k

कोल्हापूर: ' यांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवय आहे. भविष्यात ते देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी चर्चा लोकांमध्ये आहे,' असा उपरोधिक टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी आज केला. वाचा: शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. भाजपच्या नेत्यांनी त्यावर खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. त्यास भाजपनं प्रत्युत्तर दिल्यानंतर मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. 'शरद पवार यांच्याबद्दल जिंदाल यांनी केलेल्या विधानावर भाजपनं माफी मागावी एवढंच मी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांना चोमडेपणा करायला कुणी सांगितला होता? मी आमच्या पक्षाचा एजंट आहे, पवार साहेबांवर टीका केल्यानंतर गप्प बसू का?,' असा सवालही त्यांनी केला. वाचा: इतर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं आव्हान देणाऱ्या भाजपला मुश्रीफ यांनी उत्तर दिलं. 'पाच वेळा विधानसभा निवडणुकीत निवडून आलो आहे. अनेक वर्षे मंत्रिपद भूषवलं आहे. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करून जीवाला जीव देणारी माणसं तयार करावी लागतात. चंद्रकांत पाटलांना आयत्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सवयच आहे. भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राज्यसभेत पाठवलं जाणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी असल्यानं त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. पण राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा असल्याचं मुश्रीफ म्हणाले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PCyzAf

No comments:

Post a Comment