Breaking

Sunday, April 4, 2021

दहशतवाद्यांच्या गोळीबारात न्यायमूर्तीसह तिघांची हत्या; पाकिस्तानमध्ये खळबळ https://ift.tt/39ILGXs

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी दहशतवादविरोधी न्यायालयाच्या न्यायमूर्तींसह त्यांच्या कुटुंबातील तिघांची हत्या केली. यामध्ये न्यायमूर्तींची पत्नी आणि एका वर्षाच्या नातूचा समावेश आहे. या गोळीबारात त्यांच्यासोबत असणारे अंगरक्षक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील दहशतवादविरोधी कोर्टाचे न्यायमूर्ती आफताब आफ्रिदी हे आपल्या कुटुंबासह पेशावर-इस्लामाबाद महामार्गावरून प्रवास करत होते. दहशतवाद्यांनी त्याच वेळेस त्यांच्यावर गोळीबार केला. घटनास्थळी दाखल झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही हत्या लुटीसाठी करण्यात आली नाही. दहशतवाद्यांनी न्या. आफ्रिदी यांना ठार मारण्यासाठीच हा गोळीबार केला असण्याची अधिक शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे जिल्हा पोलीस अधिकारी मोहम्मद शोएब यांनी सांगितले. वाचा: वाचा: खैबर पख्तूनख्वाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सनाउल्लाह अब्बासी यांनीदेखील घटनास्थळाचा दौरा केला आणि घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी आफ्रिदी यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. ही हत्या ९ एमएम कलाशनिकोव बंदुकीने केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाचा: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असेही त्यांनी म्हटले. याआधी फेब्रुवारी २०१९मध्ये पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. अयूब खान यांच्या कारवरही हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे प्राण बचावले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fUi3qb

No comments:

Post a Comment