Breaking

Sunday, April 4, 2021

भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाची अमेरिकेत हत्या https://ift.tt/3cPXdWJ

भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळच्या ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मागील बुधवारी ही घटना घडली. शरीफ रेहमान असे या तरुणाचे नाव आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, आरोपीचे शरीफच्या मैत्रिणीवर एकतर्फी प्रेम होते. शरीफचा मोठा भाऊ मुकीम याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, माझ्या लहान भावाची सेंट लुइसमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मला केवळ इतकीच माहिती मिळाली आहे. युनिव्हर्सिटी सिटी पोलिसांना याबाबत माहिती घेण्यासाठी फोन केला होता. मात्र, त्यांनी एसओपीचा हवाला देतानाच याबाबत माहिती देण्यास नकार दिला. माध्यमांवरील वृत्ताबाबत शरीफच्या सहकाऱ्यांनीही काहीही माहिती दिली नाही. शरीफ रेहमान याची आई आणि भाऊ भोपाळच्या सुभाष नगर परिसरात राहतात. शरीफवर अमेरिकेतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिकागोमध्ये भारतीय राजदूतांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ते अधिकारीही ज्या कंपनीत शरीफ काम करत होता, त्या कंपनीच्या एचआर प्रमुखाच्या संपर्कात आहेत. कंपनी व्यवस्थापनानेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शरीफच्या कुटुंबीयांना दिले आहे. गेल्या बुधवारी सॉफ्टवेअर इंजिनीअर शरीफ रेहमान हा युनिव्हर्सिटी सिटी अपार्टमेंटमध्ये जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याची मैत्रीणही याच अपार्टमेंटमध्ये राहते. शरीफला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. युनिव्हर्सिटी सिटी पोलिसांनी या प्रकरणात संशयित कोल जे मिलर याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3dxuBRi

No comments:

Post a Comment