Breaking

Saturday, April 3, 2021

लहानग्याना करोनापासून जपा; ही काळजी घ्या https://ift.tt/3cPVssS

टीम मटा, मुंबई विषाणूने गेल्या मार्चपेक्षाही यंदाच्या मार्चने अनेकांची चिंता वाढवली आहे. लहान मुलांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे. लहान मुलांमध्ये करोनाची सगळी लक्षणे दिसत नसल्याने काही वेळा त्यांच्या माध्यमातून रोग अधिक प्रमाणात पसरण्याचीही शक्यता असते. लॉकडाउनकाळात बाहेर फिरण्यावर दीर्घकाळ मर्यादा आल्यानंतर, आता पुन्हा घरात थांबण्याचे बंधन मुलांवर घालणे कठीण होत आहे. मात्र मुलांना जपणे ही सध्याची गरज असल्याची आग्रही भूमिका वैद्यकीय तज्ज्ञ मांडत आहेत. ठाणे येथील डॉ. संदीप केळकर यांनी याबाबत वर्षभरात बदललेले चित्र अधोरेखित केले. कोविडच्या पहिल्या लाटेच्या काळात रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या कमी होती. मात्र सध्या अख्खे कुटुंब करोनाग्रस्त होताना दिसत आहे. १२ वर्षांहून लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणे फारशी दिसत नाहीत किंवा ती सौम्य असतात. मात्र १२ वर्षांवरील मुलांमध्ये न्यूमोनिया, फुप्फुसांना संसर्ग दिसत आहे. नवा स्ट्रेन अधिक आक्रमक असल्याचेही निदर्शनास आले आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये हा विषाणू शरीरात शिरकाव करत असून त्यांच्यामध्ये लक्षणेही दिसत आहेत, असे निरीक्षण डॉ. केळकर यांनी नोंदवले. मास्क, सॅनिटायझर, वारंवार हात धुणे, गरम पाणी पिणे ही काळजी आधीप्रमाणेच आताही घ्यायलाच हवीच. शिवाय लहान मुलांनी घराबाहेर जाणे काही काळासाठी टाळणे गरजेचे आहे. क्लास, खेळायला जाणे, मॉलमध्ये फिरणे हे टाायला हवे. घरात लक्षणे आढळल्यास लहान मुलांच्याही तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. लक्षणांच्या पहिल्या पाच दिवसांनंतर प्रकृती अधिक बिघडू शकते. यासाठी बारकाईने निरीक्षण आवश्यक असते. मुलांमध्येही श्वासोच्छ्वासास त्रास, कफ, खोकला वाढणे, दम लागणे, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे सर्दी-खोकला झाला की, लगेच घरातही मास्क वापरायला सुरुवात करावी. लहान मुलांना वैद्यकीय सल्ला घेऊन सी, डी व्हिटॅमिन, झिंक यांच्या गोळ्या सुरू कराव्यात, असेही डॉ. केळकर यांनी सुचवले. लहान मुलांमध्ये मल्टि सिस्मिट इन्फ्लमेटरी सिंड्रोम वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. कोविड बाधा झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनंतर मुलांमध्ये आजारापश्चाक त्रासाची तीव्र लक्षणे दिसू शकतात. शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे वेगवेगळ्या अवयवांवर परिणामही करू शकतात. गेल्या वर्षभरात करोनाग्रस्त लहान मुलांच्या अनेक अवयवांवर परिणाम झालेला दिसून आला आहे. त्यामुळे पालकांनी जागरुक राहून लक्षणांवर नजर ठेवणे आवश्यक आहे. डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनीही गेल्या काही दिवसांत मुलांना मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचे सांगितले. लहान मुलांमध्ये ताप, चिडचिड, उलट्या, मळमळणे, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. लक्षणे दिसल्यास ताप, एक मिनिटातील श्वासाचा वेग, ऑक्सिमीटरने घेतलेल्या नोंदी, लघवीचे प्रमाण अशा गोष्टी नोंदवून ठेवाव्या, असेही आवाहन त्यांनी पालकांना केले. साध्या तापाची लस फायदेशीर सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना डॉ. अमोल अन्नदाते यांनी दिवाळीनंतर लहान मुलांनी घराबाहेर जायला सुरुवात केली त्यामुळे एकंदरच संपर्क तसेच प्रादुर्भाव वाढला, असे स्पष्ट केले. या स्ट्रेनचा प्रादुर्भाव अधिक असल्याने करोनाग्रस्त प्रौढांची संख्या वाढेल, तसेच प्रमाण लहान मुलांमध्येही वाढत जाईल. कोविड काळात घेतल्या जाणाऱ्या काळजीबद्दल लहान मुलांना पुन्हा आठवण करून देणे आवश्यक आहे. लहान मुलांना सर्दी-खोकला होतोच, असे गृहित धरले जाते. मात्र त्याकडे आता दुर्लक्ष होऊ नये. मुलांमध्ये आजार फैलावू नये यासाठी साध्या तापाची लस देऊन त्याचा फायदा होईल, अशी माहिती त्यांनी दिली. लहानग्यांकडून संसर्गाची शक्यता आजाराचा सामना करण्यासाठी मुलांचे वजन प्रमाणात असणे गरजेचे आहे. अन्यथा त्याचा रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. मुलांना ताप आहे का, पुरळ येत आहे का, अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने तो मिठी मारणे, पाप्या घेणे टाळावे, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31INTxs

No comments:

Post a Comment