नवी : दिल्लीतील उत्तरेकडील गावात पत्नी आणि दोन चिमुकल्यांच्या हत्येनंतर तरुणाने स्वतःही गळफास घेऊन केली. धीरज यादव (वय २९), पत्नी आरती यादव (वय २८), त्याचा मुलगा हितेन (वय ६) आणि अथर्व (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, धीरजचा मोठा मुलगा बोलू शकत नव्हता. तर लहान मुलगा दिव्यांग होता. त्याच्या पत्नीचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. पोलिसांना मृतदेहांशेजारी सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात धीरजने आयुष्यात नैराश्य आल्याचा उल्लेख केला होता. या घटनेचा पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरून सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात धीरजने आयुष्यात काहीही न करता आल्याचे दुःखं आणि भविष्यातील असुरक्षिततेबाबत लिहिले आहे. धीरजचे वडील महासिंह यांनी सांगितले की, दोन्ही नातू दिव्यांग आहेत. लहानग्याच्या बाबतीत डॉक्टरांनी सांगितले होते की आयुष्यभर त्याची सेवा करावी लागेल. त्यामुळे धीरजला चिंता सतावत होती. माझा मुलगा या परिस्थितीचा सामना करू शकला नाही. सगळे काही संपले आहे, असे ते म्हणाले. महासिंह यांचे कुटुंब रोहिणी परिसरातील नाहरपूर गावात राहते. तीन मजली घर असून, तळमजल्यावर महासिंह आणि त्यांची पत्नी सुदेश राणी आणि त्यांची आई राहते. त्यांचा मोठा मुलगा नीरज, त्याची पत्नी आणि दोन मुले पहिल्या मजल्यावर राहतात. तर दुसऱ्या मजल्यावर धीरज आणि त्याचे कुटुंब राहत होते. तो डीटीसीमध्ये चालक म्हणून कार्यरत होता. रोहिणी आगारात तो कामाला होता. पोलिसांना गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासात धीरजने पत्नीची आणि मुलांची हत्या करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळाहून पोलिसांना चाकू सापडला आहे. तिथे एक सुसाइड नोटही मिळाही आहे. त्यात त्याने आपले दुःखं व्यक्त केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39ARhPg
No comments:
Post a Comment