क्युबेक: कॅनजडामधील एका मेंदूच्या आजारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मॅड काऊ डिजीज सारख्या या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४३ जण बाधित झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दुर्मिळ आणि घातक मेंदूचा आजार असून क्रूट्जफेल्ट-जॅकोब () अथवा CJD या नावाने आजार ओळखला जातो. या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे कॅनाडाच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. पहिल्यांदा हा आजार वर्ष २०१५ मध्ये समोर आला होता. त्यानंतर मागील काही वर्षात या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. वर्ष २०२० मध्ये २४ जणांना याची बाधा झाली होती. तर, वर्ष २०२१ मध्ये आतापर्यंत ६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. या आजारामुळे नागरीक चिंतेत असल्याचे बर्ट्रेंडचे महापौर मेयर यवन गोडिन यांनी सांगितले. वाचा: महापौरांनी सांगितले की, शहरातील नागरीक चिंतेत आहे. मटण खाल्ल्यामुळे हा आजार कमी होतोय का असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे. त्यामुळे या आजाराबाबत आम्हाला अधिक माहिती हवी आहे. कॅनडाचे वैज्ञानिकांनी या आजाराशी संबंधित संशोधन सुरू केले आहे. हा आजार क्रुट्जफेल्ट-जॅकोब आजार नसल्याचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. नील कॅशमॅन यांनी सांगितले. वाचा: वैज्ञानिकांनी सांगितले की, या आजार जटील आहे. त्यामुळे त्यासाठी आम्हाला अनेक चाचण्या कराव्या लागत आहेत. कॅशमॅन आणि तज्ज्ञांची एक टीम या आजाराशी संबंधित सर्व प्रश्नांवर काम करत आहेत. लोकांनी या आजाराबाबत अधिक गोंधळाचे वातावरण तयार न करण्याचे आणि नेहमीसारखी दिनचर्या सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. वाचा: आहे तरी काय? मॅड काऊ आजार हा गाई आणि गोवंश प्राण्यांमध्ये होणार एक आजार आहे. यामध्ये बोविन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफॅलोपॅथीच्या नावाने ओळखले जाते. एका असामान्य प्रोटीनमुळे फैलावणारा हा एक घातक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारामुळे मेंदू आणि पाठिच्या कण्यावर परिणाम करतो. ब्रिटनमध्ये १९८६ मध्ये पहिल्यांदा हा आजार आढळून आला होता. मात्र, हा आजार १९७० पासून सुरू झाला होता असाही काही संशोधकांचा दावा आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wvdgkO
No comments:
Post a Comment