मुंबई: सोनी टीव्हीवरील सिंगिंग रिअलीटी शो च्या मंचावर बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री यांनी धम्माल केली. शनिवारी प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये रेखा यांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक मजेदार आठवणी आणि अनुभव परीक्षक आणि स्पर्धकांसोबत शेअर केले. पण जिथे रेखा असतील तिथे यांचा उल्लेख होणार नाही असं तर होणारच नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा इंडियन आयडॉलच्या मंचावर आली. शनिवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अनेकदा अमिताभ बच्चन यांचं नाव न घेता त्याची आठवण काढण्यात आली. सर्वात आधी एपिसोडच्या सुरुवातीला जेव्हा होस्ट जय भानुशालीनं नेहा कक्कर आणि रेखा यांना विचारलं, कधी तुम्ही कोणत्या महिलेला एवढं वेडं झालेलं पाहिलं आहे का? आणि तेही विवाहित पुरुषासाठी? जयचं बोलणं पूर्ण होतं ना होतं तोच रेखा म्हणाल्या 'मला विचारा ना.' रेखा यांचं बोलणं ऐकल्यानंतर मंचावरील प्रत्येकजण हैराण झाला होता. पण मग सर्वांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर रेखा यांनी लगेचच बोलणं बदलत म्हटलं, 'मी काहीच नाही बोलले.' पण त्यांचा हा रोख अमिताभ बच्चन यांच्याकडेच होता हे काही वेगळं सांगायला नको. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. इंडियन आयडॉलच्या मंचावर अरुणिताचं गाणं ऐकल्यानंतर रेखा म्हणाल्या, 'मी सर्वात जास्त आशा आणि लता मंगेशकर यांच्यावर प्रेम करते. लता मंगेशकर यांनी गायलेल्या 'ये कहां आए गए हम' या गाण्याचं शूटिंग ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी माझ्या कानात केवळ त्यांचेच सूर वाजत होते. समोरच्या व्यक्तीवर माझं अजिबात लक्ष नव्हतं.' रेखा यांनी उल्लेख केलेलं 'ये कहां आए गए हम' हे गाणं 'सिलसिला' या चित्रपटातील असून ते अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित केलं गेलं आहे. या शिवाय दानिश खानचं गाणं ऐकल्यानंतर रेखा यांनी त्याचंही कौतुक केलं. पण यासोबत त्यांना दानिशच्या हृदयातही काही दुःख असल्याची जाणीव झाली. ज्या दुःखाचा त्यांना अनुभव आहे. कारण त्या स्वतः 'बेस्ट किंवा काहीच नाही' यावर विश्वास ठेवतात. यावेळी नाव न घेता रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना बेस्ट म्हटलं. यासोबतच त्यांनी 'उमराव जान' चित्रपटातील 'जिसकी जुस्तजू थी, उसको तो न पाया मैंने' हे गाणं त्यांनी या मंचावर सादर केलं. ज्यातून त्यांनी आपल्या हृदयातील दुःख सर्वांसमोर मांडलं. ६६ वर्षीय रेखा इंडियन आयडॉलच्या मंचावर मात्र अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील गाणी ऐकल्यानंतर जुन्या आठवणीत रमलेल्या दिसल्या. दानिशनं आपल्या सादरीकरणानंतर रेखा यांना मंचावर आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी 'मुकद्दर का सिकंदर' या गाण्यावर परफॉर्म केलं. ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांना घेऊन या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं होतं. त्याच प्रमाणे रेखा यांनी इंडियन आयडॉलच्या मंचावर अमिताभ बच्चन यांची नक्कल केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mg9DKP
No comments:
Post a Comment