Breaking

Saturday, April 3, 2021

Video : अनिता हंसनंदानीच्या नव-यासोबत राहुल वैद्यने घेतला पंगा https://ift.tt/3fSjN3d

मुंबई : १४ या कार्यक्रमामधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अर्थात . याच राहुल वैद्यने अलिकडेच अनिता हसनंदानीचा नवरा याच्याशी पंगा घेतला. रोहितशी पंगा घेणे राहुलला चांगलेच महागात पडले असे दिसते आहे कारण या दोघांच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. या व्हिडीओमध्ये राहुल आणि रोहित यांच्यात वादावादी झालेली दिसत आहे आणि त्यावनंतर रोहित याने राहुलची कॉलर पकडून त्याला वर उचलले दिसत आहे. ...तर असे घडले आता या दोघांची ही हाणामारी बघून तुम्ही नक्कीच हैराण झालात ना.. पण जरा थांबा...या दोघांमध्ये खरीखुरी नाही तर लुटूपुटुची मारामारी झाली आहे... राहुल आणि रोहित यांनी हा तयार करून त्यांच्या सोशल मीडियावर नुकताच पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी घरातच शूट केला आहे. रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटक-यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देत रोहित रेड्डी आणि राहुल वैद्य यांच्या ह्युमरचे कौतुक केले आहे. काही लोकांच्या मते रोहित आणि राहुल कोणत्या तरी प्रोजेक्टवर एकत्र काम करत आहेत. त्यावरून त्यांनी या दोघांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ शुक्ला यानेही बनवला मजेशीर व्हिडीओ काही दिवसांपूर्वी रोहित रेड्डीने असाच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ शुक्ला होता. त्यालाही नेटक-यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. रोहित रेड्डी आणि अनिता हसनंदानी यांना काही दिवसांपूर्वी एक गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ते सध्या त्यांचा सर्व वेळ आपल्या लाडक्या लेकासोबत घालवत आहेत. तर राहुल वैद्य बिग बॉस १४ हा कार्यक्रम संपल्यानंतर लग्नाच्या तयारीला लागला आहे. त्यानंतर तो नवीन प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3duEFKV

No comments:

Post a Comment