Breaking

Sunday, April 18, 2021

ब्लॅक मंडे ; शेअर बाजाराला हुडहुडी, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला, तीन लाख कोटींचा फटका https://ift.tt/3e97soC

मुंबई : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या दोन लाखांवर गेली असून करोना नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्याचे पडसाद आज भांडवली बाजारावर उमटले. आज सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केली. या विक्रीने सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला तर निफ्टी ४०० अंकांची घसरण झाली. या पडझडीत गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटी गमावले. आजच्या चौफेर विक्रीने मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअर घसरले आहेत. यात सन फार्मा, इन्फोसिस, डॉ रेड्डी लॅब, टीसीएस, एचयूएल, नेस्ले, चासीएल टेक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, मारुती या शेअरला मोठा फटका बसला आहे. सध्या सेन्सेक्स १३१७ अंकांच्या घसरणीसह ४७५१४ अंकांवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४०२ अंकांच्या घसरणीसह १४२१२ अंकांवर ट्रेड करत आहे. दरम्यान आशियातील भांडवली बाजारात संमिश्र वातावरण दिसून आले. जपान, हाँगकाँग या शेअर बाजारात घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीत करोना संकटाने चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील करोनासंबंधी परिस्थितीची माहिती दिली. दिल्लीत करोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा ३० टक्क्यांवर गेला आहे. यामुळे करोना रुग्णांची विक्रमी संख्या समोर येत आहे आणि मृत्युही होत आहेत, असं केजरीवाल यांनी सांगितलं. याशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यामध्ये करोनाची स्थिती गंभीर आहे. दरम्यान, याआधी गेल्या सोमवारी देखील भांडवली बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. गेल्या सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७०० अंकांनी कोसळला होता असून निफ्टीत ४०० अंकांची घसरण झाली होती. देशात कोणत्याही क्षणी कठोर लाॅकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे या भीतीने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा लावला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3v4CC7g

No comments:

Post a Comment