नवी दिल्ली : भारतात करोना संक्रमणावर नियंत्रण येतंय असं वाटत असतानाच परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होत असल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या तब्बल ८९ हजार १२९ वर गेलीय. यामुळे आतापर्यंतच्या एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी २३ लाख ९२ हजार २६० वर पोहचलीय. गेल्या सात महिन्यांमध्ये आढळलेला हा सर्वात मोठा आकडा आहे. या अगोदर २० सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात संक्रमणबाधित ९२ हजार ६०५ रुग्ण आढळले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी ८.०० वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, करोना संक्रमणामुळे शुक्रवारी ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा १ लाख ६४ हजार ११० वर पोहचलाय. यापूर्वी २१ ऑक्टोबर रोजी २४ तासांत संक्रमणामुळे ७१७ मृत्यूची नोंद झाली होती. आकड्यानुसार, देशात २४ तासांत झालेल्या मृत्यूंत सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ४८१, पंजाबमध्ये ५७, उत्तर प्रदेशात आणि मध्य प्रदेशात १६, केरळ आणि दिल्लीत १४ तर तमिळनाडूत १२ लोकांच्या मृत्यूची नोंद झालीय. संक्रमणाच्या बाबतीतही महाराष्ट्राचा क्रमांक वचा आहे. शुक्रवारी एकाच दिवशी महाराष्ट्रात ४७ हजार ९१३, कर्नाटकात ४ हजार ९९१, छत्तीसगडमध्ये ४ हजार १७४ दिल्लीत ३ हजार ९५४ तर तमिळनाडूत ३ हजार २९० रुग्ण आढळले. चाचणीचा वेग आयसीएमआर (ICMR) नं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एकाच दिवशी १० लाख ४६ हजार ६०५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत देशात २४ कोटी ६९ लाख ५९ हजार १९२ नमुन्यांची तपासणी झालीय.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wljFPj
No comments:
Post a Comment