मुंबई: करोना रुग्णवाढीचा आकडा ४० हजारांच्या पुढं गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. तत्पूर्वी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला सर्व प्रकारची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मास्कच्या वापरावरून मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष यांना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. ( Taunts ) वाचा: करोना विषयक नियम काटेकोरपणे पाळले जात नसल्यामुळं संसर्ग वाढत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाची खिल्ली उडवणाऱ्या, लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुनावलं आहे. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा सल्ला प्रशासनातर्फे दिला जात असतानाही अनेक जण विनामास्क फिरत असल्याचं चित्र आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांत मास्क न घालता जाहीर कार्यक्रमांत सहभागी झाले होते. त्याबद्दल त्यांना विचारलं असता मी मास्क वापरत नाही, असं ते म्हणाले. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी मास्क घालणाऱ्या माजी महापौरांना त्याबद्दल विचारणा केली होती. त्यांच्या या भूमिकेमुळं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. राज ठाकरे यांच्यावर सरकार काय कारवाई करणार, असा प्रश्न लोकांमधून विचारला जाऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल राज्याला संबोधित करताना नाव न घेता राज ठाकरे यांना जोरदार टोला हाणला. वाचा: 'अनेकांना असं वाटतं की मास्क वगैरे काय लावायचा? मी मास्क वगैरे वापरत नाही असं काही लोक इतरांना सांगतात. पण मास्क न वापरण्यात शौर्य कसलं? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का? मास्क लावण्यात लाज वाटण्यासारखं काय आहे?,' असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे. 'लसीकरण घेतल्यानंतरसुद्धा मास्क लावलाच पाहिजे,' अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wljaol
No comments:
Post a Comment