मुंबई- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान हिच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांना हृदयविकाराचा त्रीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. परंतु, वडिलांच्या मृत्यूच्या वेळेस हिना मुंबईत नव्हती. ती कामानिमित्त मुंबईबाहेर होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजताच ती तडक मुंबईकडे रवाना झाली. हिना आपल्या वडिलांच्या खूप जवळ होती त्यामुळे त्यांच्या जाण्याने तिला खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे हिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत तिने घेतलेला निर्णय सांगितला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरू न शकलेल्या हिनाने काही महिने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. हिना वडिलांच्या जाण्याने इतकी हळवी झाली आहे की तिला सोशल मीडियावर वेळ घालवणं अवघड झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत ही माहिती दिली. तिने लिहिलं, 'माझ्या प्रिय बाबांचं २० एप्रिल २०२१ रोजी निधन झालं आणि ते आम्हाला सोडून गेले. माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या आणि विचारपूस करणाऱ्या सगळ्यांची मी आभारी आहे. मी आणि माझं कुटुंब या धक्कातून अजूनही सावरलो नाही. त्यामुळे पुढील काही दिवस मी सोशल मीडियापासून दूर जात आहे. माझी टीम तुम्हाला माझ्या कामाबद्दलच्या बातम्या देत जाईल. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.' हिना तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यांनी अनेक अडचणींचा एकत्र सामना केला होता. हिना खानच्या अभिनेत्री बनण्याच्या ध्येयात तिचे वडील सतत तिच्या पाठीशी होते. हिना तिच्या वडिलांसोबत अनेक मजेशीर व्हिडीओ काढून पोस्ट देखील करत असे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने हिना खूप जास्त एकटी पडली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3vldhWP
No comments:
Post a Comment