मुंबई: आपल्या बिनधास्त विधानांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे . मागच्या काही काळापासून कंगना आणि अभिनेत्री तापासी पन्नू यांच्या सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. अनेकदा दोघींही अप्रत्यक्षपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकींवर टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा कंगनानं ट्वीटरवर तापसीची खिल्ली उडवली आहे. तिचं नुकतंच केलेलं एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. कंगनानं आपल्या एका ट्वीटमध्ये तापसीला 'शी-मॅन' म्हणत तिची खिल्ली उडवली आहे आणि हे सर्व अर्बन डिक्शनरी नावाच्या ट्वीटर अकाऊंटनं केलेल्या एका ट्वीटमुळे झालं आहे. या अकाऊंटवरून तापसी पन्नूबद्दल एक ट्वीट केलं आहे. अर्बन डिक्शनरी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'तापसी पन्नूचा समावेश बॉलिवूडच्या अशा अभिनेत्रींध्ये ज्या आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. तिला पद्मश्री सन्मानित कंगना रणौतची स्वतःतली कॉप म्हटलं जातं आणि ती पप्पू गँगची सदस्यसुद्धा आहे. ती कंगनाचं वॉलमार्ट व्हर्जन आहे.' कंगना रणौतनं अर्बन डिक्शनरीचं हे ट्वीट शेअर करताना त्यासोबत एक कॅप्शन लिहिलं आहे. ज्यावरू कंगनाला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तिनं लिहिलं, 'हाहाहा शी-मॅन आज खूप खूश असेल' या कॅप्शनसोबत कंगनानं हसणारा इमोजी पोस्ट केला आहे. कंगनाच्या या ट्वीटमुळे सध्या ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. एका युझरनं लिहिलं, 'तर मग तुझ्यात आणि बॉलिवूडमध्ये काय फरक राहिला. सर्वजण सुशांतसाठी एकत्र आले होते. पण आता सर्व मिळून दुसऱ्या कोणासाठी तरी तसंच वागत आहेत. जसं बॉलिवूडकर सुशांतसोबत वागले.' दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'ती तुझ्यासारखीच उत्तम अभिनेत्री आहे आणि अर्थातच ती तुझ्यापेक्षा चांगली व्यक्तीसुद्धा आहे. तुझा पाठींबा आणि स्वतातला हाहाहा तुझ्याबद्दलच बरंच काही सांगून जातो.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3gCQRfS
No comments:
Post a Comment