मुंबई : दिवसागणिक करोनाचा उद्रेक वाढत चालला असून पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहे. मोठ्या तसेच लहान पडद्यावरील अनेक कलाकार करोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या सातत्याने येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यंतरी 'डान्स दिवाने ३' च्या सेटवर १८ क्रू मेंबर्सना करोनाची लागण झाल्याने आता छोट्या पडद्यावरही भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान पडद्यावरील एकापाठोपाठ अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली असून त्यांची यादी दिवसागणिक वाढत चालली आहे. अलिकडेच 'अनुपमा' कार्यक्रमातील अनेक कलाकार आणि क्रू मेंबर्स करोना पॉझिटिव आढळून आले आहेत. आता ‘इंडियन आयडॉल १२’ चा होस्ट आदित्य नारायणला देखील करोनाची लागण झाली आहे. अर्थात काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने आदित्यने 'इंडियन आयडॉल १२' कार्यक्रमातून सुट्टी घेतली होती. याच आजारपणामध्ये त्याला करोनाची लागण झाली आहे. आपल्याला करोना झाल्याची बातमी आदित्य नारायणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. आदित्यने लिहिले आहे की, 'दुर्दैवाने मला आणि माझी बायको, श्वेताला करोना झाला आहे. सध्या आम्ही घरीच झालो आहोत. प्लीज तुम्ही ही सुरक्षित रहा. करोनाची गाईडलाईन तुम्ही सर्वांनी फॉलो करा आणि आमच्यासाठी प्रार्थना करा.. हा कठीण काळही निघून जाईल.' आदित्यच्या या पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया व्यक्त करत असून, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. लवकरच त्याने कामाला सुरुवात करावी, यासाठी ते आदित्यला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, आदित्यची तब्येत सध्या ठीक नसल्याने इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमातून काही काळासाठी सुट्टी घेतली आहे. सध्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी जय भानुशालीकडे दिली आहे. आदित्यच्या जागी जय भानुशाली गेल्या काही दिवसांपासून आदित्य आजारी असल्याने तो सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी जय भानुशालीकडे सोपवली आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस हा कार्यक्रम जय होस्ट करणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमोही नुकताच रिलीज झाला आहे. टिव्हीचे कलाकारही करोनाच्या विळख्यात ‘अनुपमा’ मालिकेतील क्रू मेंबर्स शिवाय रुपाली गांगुली, आशिष महरोत्रा, सुधांशु पांडे आणि पारस कलनावत यांनाही करोनाची लागण झाली होती. पारस आता बरा झाला असून रुपाली आणि आशिष क्वारंटाईन आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘डान्स दिवाने ३’ या शोमधील १८ क्रू मेंबर्सही पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याआधी 'गुम है किसी के प्यार में' मधील नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांना करोना झाला होता. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमातील कलाकारांनाही करोना झाला होता. यातील मंदार चंदवादकर आणि मयुर वकानी यांना करोनाची लागण झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ukqTBs
No comments:
Post a Comment