Breaking

Saturday, April 3, 2021

बॉलिवूडला आणखी एक झटका, आलियानंतर अक्षय कुमारला करोनाची लागण https://ift.tt/3uhYID6

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून देशभरात करोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. याचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला आहे. मागच्या काही दिवसांत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी करोना व्हायरसची शिकार झाले आहे. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारची सुद्धा भर पडली आहे. अक्षय कुमारनं त्याला करोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून दिली. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या अक्षयनं त्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली. अक्षयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'नुकतीच माझी करोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून मी स्वतःला घरीच क्वारंटाइन केलं आहे. मी स्वतःची सर्व काळजी घेत आहे आणि करोना संबंधिच्या नियमांचं पालन करत आहे. जे लोक मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आले आहेत त्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. मी लवकरच परत येईन.' अक्षय कुमारच्या या पोस्टवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेक चाहते तो लवकर ठीक व्हावा यासाठी कामना करताना दिसत आहे. अक्षयच्या फोटोवर कमेंट करताना अनेक युझर्सनी 'सर तुम्ही लवकर ठीक व्हा' असं म्हटलं आहे. अक्षयच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर, तो लवकरच सारा अली खान आणि धनुष यांच्यासोबत 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं. याशिवाय त्याचा बहुचर्चित 'सूर्यवंशी' हा चित्रपटही मागच्या वर्षभरापासून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण सध्या देशातली करोनाची स्थिती पाहता पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट, आमिर खान, परेश रावल, रणबीर कपूर, संजय लीला भंसाली, सतीश कौशिक, कार्तिक आर्यन, तारा सुतारिया अशा अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. तर मागच्या वर्षीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना करोना व्हायरसची लागण झाली होती. ज्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या, अर्जुन कपूर, मलाइका अरोरा या सेलिब्रेटींचा समावेश होता. दरम्यान करोनाच्या काळात बॉलिवूडला बरंच नुकसान सोसावं लागलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3wsbKQc

No comments:

Post a Comment