बीजिंग: एक विवाह सोहळा पार पडत असताना वराच्या आईची नजर आपल्या होणाऱ्या सुनेच्या हातावर पडली. तिचे हात पाहून आईला धक्काच बसला आणि विवाह सोहळा थांबला. आपली होणारी सून ही हरवलेली आपलीच मुलगी आहे, हे समजल्यानंतर आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुलीच्या हातावर असलेल्या एका विशिष्ट चिन्हामुळे मुलीची ओळख पटली. एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी असणारी घटना चीनमध्ये घडली. चीनमधील जिआनग्सू प्रांतातील सोझोउ प्रांतात ही घटना घडली. हा विवाह सोहळा ३१ मार्च रोजी पार पडत होता. चीनमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या हातावर असलेली खूण पाहिल्यानंतर मुलाच्या आईने मुलीच्या आई-वडिलांकडे चौकशी केली. या मुलीच्या आई-वडिलांनी तिला २० वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. मात्र, ही बाब त्यांनी मुलीला सांगितली नव्हती. ही मुलगी लहान असताना रस्त्यावर पडलेली सापडली होती. त्यानंतर त्यांनी तिचे संगोपन केले. हरवलेली आई सापडल्यामुळे मुलीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वाचा: वाचा: तरीही लग्न झाले! होणारी सून आपलीच मुलगी असल्याचे समजल्यानंतरही हा विवाह सोहळा पार पडला. नवरदेव असणाऱ्या मुलालाही दत्तक घेण्यात आले होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २० वर्षापूर्वी मुलगी हरवल्यानंतर नवरीच्या खऱ्या आईने एका मुलाला दत्तक घेतले. आता याच मुलाचा विवाह त्यांच्या मुलीसोबत झाला. नवरीच्या खऱ्या आईने सांगितले की, अनेक वर्ष मुलीचा शोध घेतला होता. मात्र, ती सापडली नव्हती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39KuDo2
No comments:
Post a Comment