Breaking

Monday, April 5, 2021

तृणमूल नेत्याच्या घराबाहेर सापडले ईव्हीएम, अधिकारी निलंबित https://ift.tt/3wxaQSI

हावडा : दरम्यान आज (मंगळवारी) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरू आहे. बंगालमध्ये आज एकूण ३१ जागांवर मतदान होतंय. मतदान सुरू होताच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तृणमूल काँग्रेसनं मतदान केंद्रांवर मतदारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे तृणमूल नेत्याच्या घराच्या बाहेर ईव्हीएम सापडल्याचा दावा भाजपनं केलाय. उलुबेरिया उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवारी चिरन बेरा यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला आहे. मतदानाच्या आदल्या रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते गौतम घोष यांच्या घराच्या बाहेर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळल्याचा दावा बेरा यांनी केलाय. तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीत गडबड-गोंधळ घालण्यात येत असल्याचा आरोप नेत्यांनी केलाय. रात्री उशिरा इथं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुरक्षादलांनी लाठीचार्जही केला. दरम्यान, नेत्याच्या घराजवळ ईव्हीएम सापडल्यानंतर निवडणूक आयोगानं यासंदर्भात कारवाई केलीय. या भागातील एका विभाग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. तसंच निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात स्पष्टीकरणही देण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, तृणमूल नेत्याच्या घराबाहेर सापडलेलं ईव्हीएम एक रिझर्व्ह मशीन होतं. या मशीनचा वापर आज मतदानासाठी केला जाणार नव्हता. विभागीय अधिकारी तपन सरकार ईव्हीएम सोबत आपल्या एका नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. हे नियमांचं उल्लंघन आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतरही तृणमूलकडून ईव्हीएममध्ये गडबड आणि मतदान केंद्रांवर लोकांना न जाऊ देण्याचा आरोप भाजपवर केलाय. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत मतदान केंद्रांजवळ १०० मीटर भागात जमलेले दिसत असल्याचंही तृणमूलनं म्हटलंय.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3uqYvxk

No comments:

Post a Comment