Breaking

Wednesday, April 14, 2021

चिंता वाढली! परभणी जिल्ह्यात तब्बल ११२ पोलिसांना करोना https://ift.tt/3tmVTAx

नजीर खान । परभणी जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून बुधवारी एका दिवसात तब्बल ११७२ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर राहून लढणारे पोलीसही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जिल्हा पोलिस दलातील तब्बल ११२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर काही होम क्वारंटाइन आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळं चिंता वाढली आहे. वाचा: करोनाची लागण झालेल्या पोलिसांमध्ये १६ अधिकारी, ८६ पोलिस कर्मचारी आणि १० होमगार्डचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांप्रमाणे पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारीसुध्दा अहोरात्र कर्तव्यावर आहेत. करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकडे लक्ष देणे, कायदा-सुव्यवस्था राखणे अशी दुहेरी भूमिका पोलीस पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बुधवारपासून संचारबंदीचा आदेश नव्याने लागू झाल्यापासून पोलीस प्रशासनावरील जबाबदारी आणखी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या व्यक्तींना प्रतिबंध करणे, विना मास्क फिरणारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करणे या गोष्टी अनिवार्य ठरल्या आहेत. त्यातच मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी बाधित होत असल्यानं पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५८ पोलीस कर्मचारी-अधिकारी बाधित झाले आहेत. त्यात ४१ अधिकारी, २०३ कर्मचारी, ११ होमगार्ड, दोन लिपीक व एका शिपायाचा समावेश आहे. तर, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११२ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील अनेक जण होमक्वारंटाइन असून काही जण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यात एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह तीन पोलीस निरीक्षक, तीन साहाय्यक पोलीस निरीक्षक, ९ फौजदारांचा समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32cSIzs

No comments:

Post a Comment