म. टा. प्रतिनिधी मुंबई : आगामी १५ दिवस मुंबई लोकलमधून केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. गेले १५ दिवस जमावबंदी, लॉकडाउनमुळे अनेकांना रेल्वेप्रवास शक्य झालेला नाही. आज, गुरुवारपासून सामान्यांसाठी लोकल बंद राहणार आहे. ही स्थिती पाहता सर्वसामान्यांच्या पासला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. वाचा: राष्ट्रीय लॉकडाउननंतर सुरू झालेल्या अनलॉक काळात प्रवासी रहदारी सुरू झाली. लॉकडाउन काळात ज्यांना प्रवास शक्य झाला नाही, त्यांना प्रवास न केलेले दिवस वाढवून देण्यात आले. यानंतरच्या काळात म्हणजेच फेब्रुवारी-मार्चपासून करोना बाधितांच्या संख्येत पुन्हा हजारोंनी वाढ झाल्याने पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कडक संचारबंदी कालावधीत निर्बंधासह वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. मात्र लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी पुढील १५ दिवस लोकलप्रवेश नाकारण्यात आला आहे. गेले १५ दिवसही प्रवास होऊ शकलेला नाही. यामुळे एप्रिलमध्ये काढलेला पास वाया जात आहे. मे महिन्यात नियम हेच राहतील की काढून टाकण्यात येईल, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. वाचा: सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासी पासला एक महिना मुदतवाढ देण्यात यावी. यासाठी रेल्वे प्रवाशांच्या वतीने राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी. तसेच ही मागणी पूर्ण होईपर्यंत केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2Q3MBeq
No comments:
Post a Comment