Breaking

Thursday, April 1, 2021

किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, चार महिन्यांपासून आहेत इस्पितळात https://ift.tt/3u8CLq3

मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडमधील खासदार या गेल्या काही महिन्यांपासून रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत आहेत. भाजप पक्षाच्या एका सदस्याने त्यांच्या आजाराबद्दल खुलासा केला आहे. किरण या मल्टीपल मायलोमा आजाराने ग्रस्त आहेत, जो रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. सध्या मुंबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी कळलं या आजाराबद्दल चंदीगडचे भाजप अध्यक्ष अरुण सूद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की ६८ बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना गेल्या वर्षी या आजाराचे निदान झाले होते. सध्या त्या उपचारानंतर बऱ्या होत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी चंडीगडच्या घरात एक हात तुटला होता. यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) येथे वैद्यकीय चाचणी केल्यानंतर या आजाराचं निदान झालं. किरण खेर यांना मल्टिपल मायलोमा असल्याचं निदान याच चाचण्यांमध्ये झालं. हा आजार डावा हात आणि उजव्या खांद्यावर पसरला होता. यामुळे त्यांना ४ डिसेंबरला उपचारासाठी मुंबईला तातडीने हलवण्यात आलं. मुंबईच्या कोकिलाबेन इस्पितळात महिनाभर केले उपचार सूद यांनी असेही म्हटलं की ताज्या चाचणीत असे आढळले आहे की हा आजार त्यांच्या हातांवर आणि खांद्यावरच संपत आहे. 'चार महिन्यांच्या उपचारानंतर त्या बऱ्या होत आहेत. त्या कोकिलाबेन इस्पितळात नसून आपल्या घरीच आहेत. पण तरीही नियमित उपचारासाठी त्यांना इस्पितळात जावं लागेल.' किरण खेर २०१४ मध्ये प्रथमच चंदीगडमधून खासदार झाल्या होत्या. त्यांनी कॉंग्रेसचे पवन बन्सल आणि आम आदमी पक्षाची सेलिब्रेटी उमेदवार गुल पनाग यांचा पराभव केला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3cFcwl5

No comments:

Post a Comment